मराठी माध्यमातील प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांसाठी ज्ञानदीपने मराठी पाढे पाठांतर ही सुविधा तयार केली आहे. या सुविधेत २ ते ३० पर्यंतचे पाढे ध्वनीफितींसह दिले असून पाढे म्हणताना करावयाचे उच्चारही शब्दात दिले आहेत. त्यांचा उपयोग करून मुले स्वत: सर्व पाढे पाठ करू शकतात.
गणितात प्राविण्य मिळविण्यासाठी पाढे पाठ असणे ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मराठी बालसंस्कृतीचा तो एक अमूल्य वारसा आहे व त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी या सुविधेचा निश्चित उपयोग होईल असे वाटते. पाढे पाठ का करावेत याविषयी माझा आधीचा पाढे पाठांतर  हा लेख पहावा. 
खाली यातील काहील पाने दाखविली आहेत.

सर्व मराठी शाळा तसेच पालकांनी ही सुविधा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावी ही विनंती.