जावास्क्रिप्ट - Date Object

Category: जावास्क्रिप्ट Published: Thursday, 20 October 2016

युजरच्या कॉम्प्युटरमधील कालमापक घड्याळाचा वापर करून दिवस, तारीख, वेळ याविषयीची माहिती जावास्क्रिप्टच्या - Date Object द्वारे मिळविता येते. 

कॉम्प्युटरमधील कालमापक घड्याळातील कालमापनाची सुरुवात 1/1/1970 यादिवशीच्या दुपारी १२ वाजल्यापासून केली जाते. यावर date object properties आधारित आहेत.

Date Object चे गुणविशेष (प्रॉपर्टीज)
* getTime() - या दिवशीच्या दुपारी १२ वाजल्यापासून झालेले मिलिसेकंद (एक सहस्रांश सेकंद) 
* getSeconds() - सेकंद (0-59)
* getMinutes() - मिनिटे(0-59)
* getHours() - तास(0-23)
* getDay() - आठवड्यातील दिवस(0-6). 0 = रविवार, ... , 6 = शनिवार
* getDate() - महिन्यातील दिवस (0-31) 
* getMonth() - महिना(0-11) 
* getFullYear() - वर्ष (1970-9999)

var currentTime = new Date() येथे date object चे मूल्य currentTime या व्हेरिएबलमध्ये साठविली जाते. आता वरील गुणविशेषांच्या साहाय्याने आपल्याला खालीलप्रकारे महिना (month), दिवस (day) व वर्ष (year) काढता येतात

महिने (0-11) ऎवजी 1-12 होण्यासाठी getMonth() मध्ये 1 मिळवावा लागतो. 

var month = currentTime.getMonth() + 1
var day = currentTime.getDate()
var year = currentTime.getFullYear()
document.write(day+ "-" + month + "-" + year)

आपल्याला सध्याच्या इलेक्ट्रॉनिक घड्याळातील वेळेप्रमाणे म्हणजे HH:MM AM/PM (तासासाठी दोन जागा व मिनिटांसाठी दोन जागा आणि सकाळचा वा दुपारचा भाग दर्शविण्यासाठी AM/PM ) वेळ दाखविण्यासाथी खालीलप्रकारे प्रोग्रॅम करता येतो.
if (minutes < 10){
minutes = "0" + minutes
}
document.write(hours + ":" + minutes + " ")
if(hours > 11){
document.write("PM")
} else {
document.write("AM")
}
वरील प्रोग्रॅममध्ये 10 पेक्षा कमी मिनिटे असतील तर पहिल्या जागेत 0 लिहिण्याची सोय केली आहे.
--------------
html व javascript चे टॅग काढून आता हा सर्व प्रोग्रॅम खालीलप्रमाने लिहिता येईल.

आजचा दिनांक - 
var currentTime = new Date()
var month = currentTime.getMonth() + 1
var day = currentTime.getDate()
var year = currentTime.getFullYear()
document.write( day+ "-" + month + "-" + year)
document.write(" 
वेळ - ");
var hours = currentTime.getHours()
var minutes = currentTime.getMinutes()
if (minutes < 10){
minutes = "0" + minutes
}
document.write(hours + ":" + minutes + " ")
if(hours > 11){
document.write("PM")
} else {
document.write("AM")
-------------
व त्याचे उत्तर असे येईल. 

आजचा दिनांक - 23-2-2011
वेळ - 9:01 AM