पीएचपी (PHP) भाग-१

Category: पीएचपी (PHP) Published: Thursday, 20 October 2016

वेबसाईटसाठी पीएचपी (PHP) प्रोगॅमिंग लॅंग्वेजचा वापर कसा केला जातो हे आपण मागच्या धड्यात पाहिले. त्यावेळी आपण फ्क्त पीएचपीच्या साहाय्याने वेबपेजचे भाग एकत्र कसे जोडता येतात हे पाहिले. परंतु पीएचपीविषयी सविस्तर माहिती आपण घेतली नव्हती. पीएचपीचा वापर करून सर्व्हरवरील डाटाबेसच्या साहाय्याने युजरला हवी ती माहिती देण्यासाठी डायनॅमिक वेबसाईट बनविता येते. त्यासाठी पीएचपीची ओळख करून घ्यावयास हवी.

पीएचपी ही मुक्त प्रणाली (Open Source) असून ती सर्व्हरवर स्थापित करावी लागते. सध्या पीएचपी ची 5.2.1 ही आवृत्ती वापरली जाते. पीएचपीमध्ये जावास्क्रिप्टप्रमाणेच व्हेरिएबलचा प्रकार (Integer, string etc) निर्देशित करावा लागत नाही.

पीएचपी कोड हे खाली दाखविल्याप्रमाणे दोन टॅगमध्ये लिहावे लागते. तसेच प्रत्येक ओळीचा शेवट ; या चिन्हाने करावा लागतो. स्क्रीनवर दिसण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये जसे document.write वापरतात तसे पीएचपीमध्ये echo ही कमांड वापरावी लागते. 

उदाहरणार्थ स्क्रीनवर Hello World हे शब्द उमटण्यासाठी खालील कोड लिहावे लागते.( यातील पॅरेग्राफचा टॅग आवश्यक नाही)

व्हेरिएबल्स -
पीएचपी व्हेरिएबलमध्ये पहिले अक्षर नेहमी $ हे चिन्ह असते. या चिन्हानंतर _ किंवा कोणतेही इंग्रजी अक्षर (a-z,A-Z) असावे लागते. उदाहरणार्थ
$a=57;
$b="Welcome to Dnyandeep"
$_name= "Web Design";
दोन अक्षरसंच एकत्र जोडण्यासाठी + ऎवजी . हे चिन्ह वापरले जाते. जसे
$_name=$_name."Course"; याचा अर्थ $_name=" Web Design Course"; असा होईल.

जावास्क्रिप्टप्रमाणे सर्व गणिती प्रक्रिया पीएचपीमध्ये व्हेरिएबल्स वापरून करता येतात. मात्र त्याचे उत्तर सर्व्हरवरील पीएचपीद्वारे एचटीएमएल पेज स्वरुपात ब्राउजरकडे पाठविले जाते.उदाहरणार्थ खालील प्रोग्रॅम पहा.

येथे $a आणि $b या दोन संख्या घेऊन त्यावर + - * / या गणिती क्रिया केल्या आहेत. प्रत्येक ओळीच्या प्रारंभी माहिती लिहून ती उत्तराला जोडली आहे व प्रत्येक उत्तर स्वतंत्र ओळीवर येण्यासाठी शेवटी br हा टॅग जॊडला आहे. 


वरील प्रोग्रॅमचे उत्तर खालीलप्रमाणे येईल.

First Number154
Second Number66
Sum of two numbers 154 and 66 = 220
Difference in two numbers 154 and 66 = 88
Multilication of two numbers 154 and 66 = 10164
Division of two numbers 154 and 66 = 2.3333333333333