जुळेवाडी या खेडेगावाची पहिली मराठी वेबसाईट

Category: वेबसाईट जनजागृती अभियान Published: Wednesday, 26 October 2016

ज्ञानदीपने गेल्या १५ वर्षांच्या काळात  सांगली (www.mysangli.com) व कोल्हापूर (www.mykolhapur.net)  या शहरांच्या मराठी माध्यमातील वेबसाईट करून महाराष्ट्रात मराठी वेबसाईट करण्यात पुढाकार घेतला आहे. आता तासगाव तालुक्यातील जुळेवाडी या छोट्याश्या खेड्याची वेबसाईट (www.julewadi.com) तयार करण्याची संधी जुळेवाडी ग्रामपंचायतीने ज्ञानदीप इन्फोटेकला दिली याबद्दल जुळेवाडी ग्रामपंचायतीस धन्यवाद् !

 जुळेवाडीने आपली वेबसाईट करून स्मार्ट व्हिलेजच्या वाटचालीत आपले पहिले पाऊल टाकले आहे. ज्ञानदीपने ही वेबसाईट तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा (Responsive Design ) वापर केला आहे. त्यामुळे ही वेबसाईट कॉम्प्युटरप्रमाणे मोबाईलवरही व्यवस्थित पाहता येते.


 

पुढारी दैनिकात याविषयी आलेल्या बातमीचे कात्रण खाली दिले आहे.


आपण ही वेबसाईट आवर्जून पहावी व आपले अभिप्राय ज्ञानदीपकडे(This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.) पाठवावेत ही विनंती.
स्मार्ट व्हिलेज या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये निवड होण्यासाठी गावाची वेबसाईट असणे उपयुक्त ठरणार आहे. इतर ही ग्रामपंचायतीनी जुळेवाडीचा आदर्श घेऊन आपल्या गावाची वेबसाईट करावी. या कार्यात ज्ञानदीप आपले सर्व सहकार्य देईल.