ज्ञानदीप फौंडेशन

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन, सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे.

ज्ञानदीप फौंडेशन - उद्दिष्टे

 

  • माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मिती करणे.
  • भाषा, धर्म, स्थान यामुळे निर्माण होणार्‍या अडथळयांना पार करून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे. वेबसाईट व संगणक प्रणाली विकसित करणे व त्यातून भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे.
  • इंटरनेटवर मिळणार्‍या ज्ञानाचा स्रोत वापरून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान वितरित करणार्‍या व्यक्तींचे संघटन करणे व अशी ज्ञानप्रसार केंद्रे उभारणे.
  • माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय व संशोधन प्रयोगशाळा, तसेच ग्रंथालय उभारणे व शैक्षणिक पोर्टल वेबसाईट तयार करणे.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांशी विविध विषयावरील दूरस्थ शिक्षणासाठी सहकार्य करणे.
  • विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देण्यासाठी परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शने आयोजित करणे तसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
  • परदेशात राहणार्‍या भारतीयांपर्यत येथील साहित्य व संस्कृती पोहोचविणे व त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य मिळविणे.
  • माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतास सशक्त राष्ट्र बनविणे आणि जागतिक मानवकल्याणासाठी ज्ञानप्रसार करण्यात भारताला अग्रेसर करणे.
  • वरील उद्दिष्टांस पूरक ठरतील असे अन्य कार्यक्रम घेणे वा त्यात सहभागी होणे.

 ज्ञानदीप फौन्डेशन या सेवाभावी संस्थेमार्फत शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी / इंग्रजी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत. या वेबसाईटवर नवी माहिती घालणे तसेच वेबसाईटच्या तंत्रज्ञानात सतत सुधारणा करणे हे कार्य गेली १० वर्षे संस्थेतर्फे अव्याहतपणे चालू आहे. यापुढील काळात या माहितीपैकी काही भागच सर्वांसाठी खुला राहणार असून सर्व माहिती पाहण्यासाठी ज्ञानदीप सदस्य होणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईट्सवरील सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी वार्षिक एकत्रित सदस्यता शुल्क १००० रुपये आहे. सदस्यांच्या इच्छेनुसार आवश्यक असणारी कोणतीही विशिष्ठ माहिती संकलित करून ती त्यांना पीडीएफ / इ मेलद्वारे उपलब्ध करून देण्याची नवी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आहे. याशिवाय विविध विषयांसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने ज्ञानदीप सदस्यांसाठी व्यक्तीगत मार्गदर्शन देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे.

ज्ञानदीप फौंडेशनच्या या नव्या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण ज्ञानदीपचे सदस्य होऊन ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हावे ही विनंती.