
रोबोटिक्स
रोबोटिक्स (Robotics) हे विज्ञान, अभियांत्रिकी (engineering) आणि तंत्रज्ञानाचे एक मिश्रण आहे. यामध्ये रोबोट्सची रचना (design), निर्मिती (construction), कार्यपद्धती (operation) आणि त्यांचा वापर यांचा अभ्यास केला जातो. मानवाची कामे सोपी, अचूक आणि सुरक्षित करण्यासाठी रोबोट्स विकसित केले जातात.

इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) ला मराठीत 'विजाणूशास्त्र' असे म्हणतात。हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक शाखा आहे जी इलेक्ट्रॉन कणांच्या नियंत्रित प्रवाहाचा अभ्यास करते आणि त्याचा वापर विविध उपकरणांच्या नियंत्रणासाठी आणि माहिती साठवण्यासाठी करते.

संगणक शिक्षण
संगणक शिक्षण (Computer Education) आजच्या डिजिटल युगात अत्यंत आवश्यक आहे. यात संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेटचा वापर, कोडिंग आणि सॉफ्टवेअर कौशल्यांचा समावेश होतो. हे शिक्षण व्यक्तीला रोजगार मिळवून देण्यासोबतच दैनंदिन व व्यावसायिक कामे जलद आणि अचूक करण्यास मदत करते.
ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन , सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे.
उद्दिष्टे-
१) माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मिती करणे.
२) भाषा, धर्म, स्थान यामुळे निर्माण होणार्या अडथळयांना पार करून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे. वेबसाईट व संगणक प्रणाली विकसित करणे व त्यातून भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे.
३) इंटरनेटवर मिळणाऱ्या ज्ञानाचा स्रोत वापरून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान वितरित करणाऱ्या व्यक्तींचे संघटन करणे व अशी ज्ञानप्रसार केंद्रे उभारणे.
४) माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय व संशोधन प्रयोगशाळा, तसेच ग्रंथालय उभारणे व शैक्षणिक पोर्टल वेबसाईट तयार करणे.
५) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांशी विविध विषयावरील दूरस्थ शिक्षणासाठी सहकार्य करणे.
६) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देण्यासाठी परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शने आयोजित करणेतसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
७) परदेशात राहणाऱ्या भारतीयांपर्यत येथील साहित्य व संस्कृती पोहोचविणे व त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य मिळविणे.
८) माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतास सशक्त राष्ट्र बनविणे आणि जागतिक मानवकल्याणासाठी ज्ञानप्रसार करण्यात भारताला अग्रेसर करणे.
९) वरील उद्दिष्टांस पूरक ठरतील असे अन्य कार्यक्रम घेणे वा त्यात सहभागी होणे.

Website Development

Mobile Apps

Software Development

Environmental Consultancy
Membership of Foundation
As it is a public trust, the approach will be to provide services with No Loss No Profit principle. There will be complete transparency as regards functioning, activities and accounts. The members can view the activity details and accounts and can suggest modifications in working of foundation. The managing body shall be elected by election through life members.






