My Solapur

माय सोलापुर

http://mysolapur.net

 

भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमधे समावेश मिळवलेला सोलापुर जिल्हा !

पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा सोलापुर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापुर या नावाने देखील ओळखला जायचा.

औद्योगिक केंद्र म्हणुन ओळख मिळवलेल्या या जिल्हयात सुती वस्त्र, सोलापुरी चादरी, प्रसिध्द असुन या शहराला कापड गिरण्यांचे शहर देखील बोलल्या जाते. विडी आणि सिगारेट उदयोगात या जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो.

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यास ईच्छुक होते, महादेवी लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्याकरता आंदोलन देखील केले पण या विवादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली, या आयोगाने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्यासंदर्भातला अहवाल शासनासमोर मांडला परंतु शासनाने तो धुडकावत न्यायालयाची मदत घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मराठी भाषेपेक्षा देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगु आणि कन्नड भाषा बोलली जाते.

सिध्देश्वर मंदिरामुळे देखील या जिल्हयाला एक आगळ वेगळं वलय प्राप्त झालं असुन दुरदुरून भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.

सोलापुरात आज देखील एका मुस्लिम किल्ल्याचे भग्नावशेष पहायला मिळतात.

सोलापुर जिल्हा सध्या सर्व त.हेच्या गणवेशांकरता ओळखला जातो, महाराष्ट्राव्यतीरीक्त हे गणवेश उपयोगात आणले जातात.