वेबसाईट कशासाठी
जुळेवाडी या खेडेगावाची पहिली मराठी वेबसाईट
ज्ञानदीपने गेल्या १५ वर्षांच्या काळात सांगली (www.mysangli.com) व कोल्हापूर (www.mykolhapur.net) या शहरांच्या मराठी माध्यमातील वेबसाईट करून महाराष्ट्रात मराठी वेबसाईट करण्यात पुढाकार घेतला आहे. आता तासगाव तालुक्यातील जुळेवाडी या छोट्याश्या खेड्याची वेबसाईट (www.julewadi.com) तयार करण्याची संधी जुळेवाडी ग्रामपंचायतीने ज्ञानदीप इन्फोटेकला दिली याबद्दल जुळेवाडी ग्रामपंचायतीस धन्यवाद् !
वेबसाईट डिझाईन - एक उदयोन्मुख नवा व्यवसाय
आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.
ग्रामविकासासाठी वेबसाईट
महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामविकासाची चांगली कामे झाली आहेत. रोजगार हमी योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम योजना, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक राज्य वा केंद्रशासनाच्या योजनांचा फायदा घेऊन आपल्या गावाची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न प्रत्येक गावातील पंचायत समिती करीत आहे
हॉस्पिटलसाठी वेबसाईट
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक हॉस्पिटलची स्वतःची वेबसाईट असणे आवश्यक बनले आहे. नोकरी व्यवसायामुळे लोकांना फार वेळ नसतो. पेशंटला तातडीने उपचार मिळण्याची ही आवश्यकता असू शकते अशा वेळी लोकांना नजिकच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली तर त्यांची चांगली सोय होऊ शकेल.
बांधकाम व्यवसायात वेबसाईटचे महत्व
वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले आहेत. पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून नगर बारामतीसारख्या छोट्या शहरांपर्यंत, सर्वत्र नवी गृहसंकुले (रेसिडेन्शियल अपार्टमेंटस) उभी रहात आहेत. नोकरदारांचे पगार वाढल्याने व बॅंकांकड्न कर्ज मिळणे सुलभ झाल्याने अनेक लोक गरज म्हणून वा गुंतवणूक म्हणून नव्या फ्लॅटसाठी पैसे गुंतवीत आहेत.