ज्ञानदीप
ज्ञानदीप मंडळ - पूर्वपीठीका
भारत सरकारने ‘सर्व शिक्षा अभियान ’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कमी किंमतीत लॅपटॉप देण्याची एक भव्य योजना आखली आहे. एकदोन वर्षात असे लॅपटॉप प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात येतील. मात्र याचा उपयोग शिक्षणासाठी न होता मनोरंजनासाठी होऊन मुलांचे अभ्यासातून मन उडेल व त्याचा शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती मला वाटते.
ज्ञानदीप मंडळ योजनेचे पुनश्च हरि ओम.
२०१३ मध्ये कोल्हापूर येथे ज्ञानदीप मंडळ योजनेची सुरुवात केल्यानंतर कोरेगाव, अकोता, रत्नागरी अशा विविध ठिकाणांहून योजनेविषयी विचारणा करणेत आली. मात्र संगणक वापरण्याचे ज्ञान तेथील शिक्षकांना नसल्याने तसेच शाळांतील संगणक नादुरूस्त असल्याने याबाबतीत पुडे फारशी प्रगती होऊ शकली नाही.
माझी रेडिओवरील मुलाखत ३ अॉगस्ट २०१२ (भाग-२)
ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक ३ अॉगस्ट २०१२ रोजी माझ्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला होता. . त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि आमचे त्यावेळचे संकल्प यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे.
माझी रेडिओवरील मुलाखत २७ जुलै २०१२ (भाग-१)
ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक २७ जुलै २०१२ रोजी माझी एक मुलाखत ( भाग-१) प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि आमच्या ज्ञानदीपची प्रगती यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे.
कै. सौ. शुभांगी रानडे - रेडिओ मुलाखत २० जुलै २०१२
संस्कृतदीपिका या वेबसाईटच्या निर्मात्या आणि तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध करणा-या सांगलीतील ज्ञानदीप इन्फोटेकच्या माजी संचालिका सौ. शुभांगी रानडे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दिनांक २२ ऑगस्ट २०१६ रोजी दुखद निधन झाले.