स्क्रॅच – गिरगोट्या

पाटीवर लिहायला शिकताना लहान मूल पेन्सिलने गिरगोट्या काढते. इंग्लिशमध्ये याला स्क्रॅचिंग म्हटले जाते, अगदी त्याचप्रमाणे केवळ पट्ट्या सरकवून व एकाखाली एक जोडून संगणक प्रोग्रॅम तयार करण्याची अभिनव सुविधा अमेरिकेतील एम आय टी मिडिया लॅबने स्क्रॅच या नावाने तयार केली असून ती इंटरनेटवरून सर्वांना मोफत उपलब्ध करून दिली आहे.

https://youtu.be/VIpmkeqJhmQ

त्याद्वारे अगदी लहान मुलांनाही चित्रांच्या हालचाली व संवाद असणा-या चित्रफिती व व्हिडिओ गेम सहज तयार करता येतात. अमेरिकेतील तसेच इतर अनेक देशांत शालेय स्तरावर संगणक प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी याचा वापर केला जातो.मुलांना हसतखेळत ही भाषा शिकता येते व संगणकावर नवीन चित्रफिती सहज करता येतात. 

ज्ञानदीप फौंडेशन मराठी माध्यमाच्या शाळांसाठी याचे मराठी रुपांतर करीत असून नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांत ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. इतर शाळांनीही याबाबतीत ज्ञानदीपशी (This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.) संपर्क साधावा. फोन- ९४२२४१०५२०   .