वेबसाईट जनजागृती अभियान

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.

Read more ...

बौद्धिक गुलाम (कोड मंकी)

(कोड मंकी यानावाने लिहिलेल्या माझ्या इंग्रजी लेखाचे रूपांतर)

 

भारतात माहिती तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने हॊत असल्याने व त्याद्वारे भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असल्याने माझ्या मनात भारतीय आय. टी. कंपन्यांबद्दल अतीव आदराची भावना होती. भारतात सर्वत्र गरिबी, दुष्काळ, महागाई व रोजगाराची बिकट अवस्था असतानाही आय.टी. कंपन्यांची भरभराट, त्यांच्या नफ्याची चढती कमान व मोठ्या प्रमाणावर गलेलठ्ठ पगार देऊन रोजगार उपलब्ध करणार्‍या या कंपन्या म्हणजे भारताला एक वरदानच आहे असे मला वाटत होते.

Read more ...

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - ४

उद्योग  व्यापारामध्ये खरेदी केलेल्या वस्तू  विक्री करावयाच्या वस्तू यांच्या साठ्यामध्ये  संख्या  किंमत या दोन्ही गोष्टींचे मूल्यमापन  त्यावर नियंत्रण करणे कसे महत्वाचे आहे हे आपण पाहिलेआता या वस्तूभांडार व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर कसे तयार करायचे ते पाहू.

 

कोणतेही सॉफ्टवेअर तयार करताना आवश्यक ती सर्वप्रकारची माहिती योग्यप्रकारे साठविण्याची व्यवस्था करावी लागते. ही माहिती संकलित करण्यासाठी डाटाबेसचा वापर केला जातो.  

Read more ...

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - 3

वस्तूंची विक्री - उत्पादन केलेल्या वस्तू विक्री होईपर्यंत विक्रीवस्तूभांडारात ठेवल्या जातात. विक्रीवस्तूभांडारातील तयार वस्तूंची संख्या व किंमत याचा ताळेबंद  खालील प्रमाणे मांडता येतो.

Read more ...

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - २

वस्तु खरेदी - निर्मिती उद्योगासाठी लागणारा कच्चा माल वा सुटे भाग यांची संख्या प्रत्येक वस्तूनुसार वेगवेगळी असते. संगणक, टीव्ही, स्कूटर, मोटार या वस्तूंसाठी अनेक सुटे भाग लागतात. हे खरेदी करताना प्रत्येक तयार वस्तूसाठी कोणत्या प्रकारच्या किती सुट्या भागांची वा वस्तूंची गरज आहे व एकूण उत्पादन क्षमता किती आहे याचा विचार करावा लागतो. 

Read more ...