ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन. भाग - २

Written by Administrator

ड्रीमव्हीवरच्या डिझाईनचे मुख्य पान 


येथे वरच्या पट्टीत फाईल(File), एडीट(Edit),व्ह्यू(View), इन्सर्ट(Insert), मॉडीफाय(Modify), टेक्स्ट(Text),कमांड्स(Commands), साईट(Site0, सोथिंक(Sothink), विंडो(Window) व हेल्प(Help) असे मेनू आहेत.
दुसर्‍या पट्टीत वेबपेजमध्ये लिंक, मेल, अँकर, टेबल, चित्र यासारख्या नेहमी लागणार्‍या गोष्टी ट्लबारच्या स्वरुपात मांडल्या आहेत. मुख्य स्टेजसाठी कोड, स्प्लिट(कोड व डिझाईन) व डिझाईन असे तीन पर्याय आहेत. यातील डिझाईन विभाग उघडून त्यात आपण माहिती लिहिली की त्याचे गुणविशेष खालच्या प्रॉपर्टीजमध्ये बदलता येतात.

वरील उदाहरणात Dnyandeep Foundation असे लिहून त्याला हेडिंगचा टॅग लावला आहे. त्याच्या खाली वरच्या पट्टीतील इन्सर्ट सुविधा वापरून ज्ञानदीपच्या लोगोचे चित्र घातले आहे. यासाठी कोणताही प्रोग्रॅम लिहावा लागला नाही.उलट असा प्रोग्रॅम आपोआप ड्रीमव्हीवरने तयार केला आहे तो खालील चित्रात पहा. 

टेक्स्ट प्रॉपर्टीज
आता Dnyandeep Foundation असे लिहून ते माउसने सिलेक्ट केले की प्रॉपर्टीज विंडोमध्ये खालील टेक्स्ट प्रॉपर्टीजचे पर्याय येतात.

इमेज प्रॉपर्टीज
तसेच ज्ञानदीपच्या लोगोचे चित्र इन्सर्ट करून ते सिलेक्ट केले की प्रॉपर्टीज विंडोमध्ये खालील इमेज प्रॉपर्टीजचे पर्याय येतात.



वरिल पर्यायात बदल करणे अगदी सोपे असते. त्याप्रमाणे कोडमध्येही बदल होतो.