शोधयंत्रास सुयोग्य वेबसाईट भाग - ४
Written by Administrator
SERPमध्ये प्राधान्यक्रमासाठी खालील गोष्टीचा विचार करावा.
१. शीर्षक - पूर्वी H1 ते H6 या हेदर टॅगला शोधयंत्राच्या दृष्टीने फार महत्व होते. पण आता ते राहिलेले नाही. तरीही h1 मुख्य शीर्षकाला, h2 उपविभागाला व h3 त्यातील छोट्या भागाला वापरणे योग्य ठरते. मुख्यत्वे मजकुराची मांडणी करताना उपशीर्षके देणे वाचकांच्या दृष्टीने व SERP साठी उपयुक्त ठरते.
२. बोल्ड वा इटालिक टॅगला फार कमी महत्व दिले जाते.
३. कीवर्ड - कीवर्डची जागा html कोडमध्ये (मजकुरामध्ये नाही) जितकी वर असेल तितके चांगले. यासाठी मेनू वा इतर माहिती पेजच्या तळाशी तर महत्वाची माहिती वरच्या बाजूस लिहावी. टायटल टॅगमधील पहिल्या कीवर्डला जास्त मह्त्व दिले जाते.
i. डोमेननेममध्ये कीवर्ड असण्याचा फारसा फायदा होत नाही. मात्र डोमेनचे नाव सुटसुटीत व लक्षात राहील असे असावे.
ii. फाईल व फोल्डरच्या नावात कीवर्ड असल्यासही थोडाफार फायदा होतो.
४. इमेज- इमेजसाठी नेहमी Alt टॅगमध्ये योग्य नाव द्यावे. कारण याचा गुगल स्निपेट लिहिण्यासाठी उपयोग करते.
On Page rank साठी उपाययोजना
१. योग्य कीवर्ड शोधणे
आपल्या वेबसाईटच्या विषयासंबंधी सोपे, नेहमीच्या वापरातील शब्द व त्याच्या समानार्थी शब्द शोधा. Google keyword tool किंवा Search based keyword tool यांचा वापर करून असे समानार्थी शब्द काढा वा शोधासाठी लोक किवा अगदी तुम्हीसुद्धा काय लिहाल याची कल्पना करा. अशा सर्व शब्दांची यादी करून Google keyword tool च्या साहाय्याने त्यातील शब्दांचा कितीवेळा वापर झाला यावर त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा. तसेच ते शब्द वापरून आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या वेबसाईट दिसतात का ते तपासा. जर अशा वेबसाईट दिसल्या तर त्यातील मजकूर वाचा व त्यातून काही नवे शब्द मिळाल्यास त्यांच्याही लोकप्रियतेचा शोध घेऊन अंतिम यादी बनवा.
२. कीवर्डच्या साहाय्याने मजकूर तयार करणे
प्रत्येक कीवर्डसाठी कोणती माहिती योग्य ठरेल याचा विचार करून मजकूर तयार करा. त्यात कीवर्डचे स्थान वर असू द्या. प्रत्येक २-३ कीवर्डसाठी एक वेगळे लँडिंग पेज केल्यास अधिक चांगले. प्रत्येक पानात काही छोटे कीवर्ड व बरेच वर्णनात्मक शब्दसमूह (long tail keywords) येतील असा मजकूर करा. सर्व कीवर्डसाठी मजकूर करताना तोच तो मजकूर घालण्याचे टाळा. सरळ साधे आपल्या शब्दात लिहा.
३. इंटरलिंक (अंतर्गत) दुवे - योग्य anchor text असणारे अंतर्गत दुवे शोधयंत्राच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. वेबसाईट डिझाईन करताना बाहेरच्या साईटवरून दुवे तयार झालेले नसतात. त्यामुळे अंतर्गत दुव्यांवरच सुरुवातीच्या काळात अवलंबून रहावे लागते. मात्र लिंकचा अतिरेक नको. तसेच लिंकचे कोड शक्यतो खालच्या बाजूस तर कीवर्ड असणारा मजकूर html कोडमध्ये वरच्या बाजूस येईल असे डिझाईन करावे.
४. नेव्हिगेशन मेनू व साईटमॅप - प्रत्येक वेबपेजवर मुख्य विभागांना जोडणारा मेनू व सर्वात खाली बहुतेक अंतर्गत पानांच्या लिंक देणारा साईटमॅप घालणे शोधयंत्रावर प्राधान्यक्रम येण्यास उपयुक्त ठरते.
५. सतत सुधारणा- नव्या वेबसाईट, प्रतिस्पर्ध्यांच्या वेबसाइटवरील वा आपल्या साईटवरील नवी माहिती यामुळे प्राधान्यक्रमात सतत बदल होत असतात. त्यामुळे seo किंवा प्राधान्यक्रमात सुधारणा करण्याची ही क्रिया कायम चालू ठेवावी लागते.