शोधयंत्रास सुयोग्य वेबसाईट भाग - २

Written by Administrator

शोधयंत्राच्या प्रोग्रॅममध्ये वापरल्या जाणार्‍या काही महत्वाच्या संज्ञा
१. Anchor text (अँकर टेक्स्ट) - ज्या मजकुराला दुसर्‍या वेबपेजचा दुवा दिलेला असतो, तो मजकूर
उदा. Dnyandeep Infotech Pvt. Ltd. मध्ये Dnyandeep Infotech Pvt. Ltd.हे अँकर टेक्स्ट आहे.
२. Inbound link or backlink इतर वेबसाईटवरून संबंधित वेबपेजला देण्यात आलेले दुवे
३. Keyword (कीवर्ड) वेबपेजमधील मजकुराविषयी माहिती देणारे सूचक शब्द वा शब्दांचा समूह. कीवर्ड हे वेबपेजमध्ये मेटा टॅगच्या स्वरुपात देता येतात. पूर्वी या शब्दांना शोधयंत्राच्या दृष्टीने फार महत्व असायचे. आता वेबपेजमधील प्रत्यक्ष माहितीवरून शोधयंत्र कीवर्ड तयार करीत असल्याने याचे महत्व कमी झाले आहे.
Short-tail and long-tail keywords - छोटे अर्थवाही समर्पक शब्द म्हणजे Short-tail keywords आणि युजरने विचारलेली प्रत्यक्षातील माहिती म्हणजे long-tail keywords. कीवर्ड म्ह्नून छोटे अर्थवाही समर्पक शब्द वापरणे योग्य असले तरी प्रत्यक्षात विचारलेल्या माहितीचे सविस्तर शब्दसमूह जास्त फलदायी असतात असे आढळून आले आहे.
४. SERP सर्प म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेज. जेव्हा युजर शोधयंत्राच्या कप्प्यात माहिती विचारून Enter बटन दाबतो. त्यावेळी उत्तरादाखल जे वेबपेज यादीचे पान दिसते (/पाने दिसतात) ते म्हणजे SERP. या पानांत आपली वेबसाईट वरच्या क्रमांकावर प्रदर्शित होण्यासाठी SEO करावे लागते.
५. SNIPET स्निपेट म्हणजे यादीतील पानावर लिंकच्या खाली जी माहिती लिहिलेली असते ती. वेबपेजच्या Description या मेटा टॅगमधून बहुधा ही माहिती घेतली जाते. हा टॅग नसेल तर शोधयंत्र अशी माहिती मूळ मजकुरापासून तयार करते.
५. LANDING PAGE लॅंडींग पेज म्हणजे यादीत दर्शविलेले विवक्षित वेबपेज.
६. Link लिंक म्हणजे मूळ पानावरून अँकरलिंक दिलेल्या पानाकडे पाठविले जाणारे मूल्य. समजा एखाद्या पानाचे मूल्य १० समजले व त्यावरून दोन लिंक दिल्या असतील तर त्या दोन्ही पानाना प्रत्येकी ५ मूल्य मिळाले असे धरले जाते.
७. Nofollow Link शोधयंत्राच्या क्रॉलर रोबोटने लिंक पाहू नये असे