जावास्क्रिप्टच्या साहाय्याने फॉर्म व्हॅलिडेशन

Written by Administrator

वेबसाईटवर माहिती भरण्याचा फॉर्म तपासण्यासाठी जावास्क्रिप्टचा वापर करण्यात येतो. फॉर्ममध्ये नाव, पत्ता, वय, जन्म तारीख, इमेल, पोस्टल कोड, फोन अशी अनेक प्रकारची माहिती विचारलेली असते. त्यातील अत्यावश्यक माहितीचे रकान्यांवर * अशी खूण केलेली असते ती भरल्याखेरीज फॉर्म स्वीकारला जात नाही. (इतर माहिती भरणे न भरणे युजरच्या मर्जीवर सोपविले जाते.) आवश्यक ती सर्व माहिती योग्यप्रकारे भरली आहे की नाही याची तपासणी जावास्क्रिप्टच्या साहाय्याने युजरच्या कॉम्प्युटरवरच केली जाते. त्यामुळे सर्व्हरकडे माहिती पाठविल्यानंतर त्यात चूक होण्याचा संभव रहात नाही. अर्थात जावास्क्रिप्टचा वापर ऎच्छीक असल्याने हा फॉर्म सर्व्हरवरही तपासला जातो. चुकीची वा अर्धवट माहिती भरलेला फॉर्म सर्व्हरकडून परत पाठविला जाण्याची शक्यता जावास्क्रिप्टच्या साहाय्याने फॉर्म व्हॅलिडेशन केल्यावर रहात नाही. 

माहिती तपासताना माहितीच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या कसोट्या लावल्या जातात. 
नाव तपासताना शब्दांऎवजी मोकळी जागा नाही ना हे तपासले जाते.
खालील उदाहरण पहा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

येथे head टॅगमध्ये validateForm() हे फंक्शन लिहिले आहे. तर body टॅगमधील फॉर्म मध्ये ते वापरले आहे. या फंक्शनमध्ये myForm नावाच्या फॉर्ममधील x नावाच्या व्हेरिएबल( चलसंख्या) मध्ये fname (नाव) घेऊन त्याचे मूल्य तपासले जाते व ते ’काहीच नाही’( तो रकाना भरलाच नाही तर) किंवा त्याची लांबी ० असेल तर First name must be filled out अशी दक्षता सूचना दिली जाते.

 

 

 

 



इमेलसाठी लागणार्‍या कसोट्यात @ व (.) ची जागा तपासली जाते.या तपासणीसाठी लागणारा जावास्क्रिप्ट्चा प्रोग्रॅम खाली दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


येथे atpos म्हणजे @ चे स्थान व dotpos म्हणजे शेवटच्या . चे स्थान. इमेलमध्ये @ चे स्थान १ पेक्षा कमी असता कामा नये ( म्हणजे इमेलमध्ये @ हे चिन्ह असले पाहिजे.) @ व . जोडून नसावेत तसेच @ चे स्थान शेवटचे नसावे.
दक्षता सूचना



तारीख, पोस्टल कोड व फोन यासाठी संख्यांचा ठराविक फॉरमॅट (Format) आहे का ते पाहण्यासाठी अशाच कसोट्या वापरल्या जातात. 

जावास्क्रिप्ट - Date Object

Written by Administrator

युजरच्या कॉम्प्युटरमधील कालमापक घड्याळाचा वापर करून दिवस, तारीख, वेळ याविषयीची माहिती जावास्क्रिप्टच्या - Date Object द्वारे मिळविता येते. 

कॉम्प्युटरमधील कालमापक घड्याळातील कालमापनाची सुरुवात 1/1/1970 यादिवशीच्या दुपारी १२ वाजल्यापासून केली जाते. यावर date object properties आधारित आहेत.

Date Object चे गुणविशेष (प्रॉपर्टीज)
* getTime() - या दिवशीच्या दुपारी १२ वाजल्यापासून झालेले मिलिसेकंद (एक सहस्रांश सेकंद) 
* getSeconds() - सेकंद (0-59)
* getMinutes() - मिनिटे(0-59)
* getHours() - तास(0-23)
* getDay() - आठवड्यातील दिवस(0-6). 0 = रविवार, ... , 6 = शनिवार
* getDate() - महिन्यातील दिवस (0-31) 
* getMonth() - महिना(0-11) 
* getFullYear() - वर्ष (1970-9999)

var currentTime = new Date() येथे date object चे मूल्य currentTime या व्हेरिएबलमध्ये साठविली जाते. आता वरील गुणविशेषांच्या साहाय्याने आपल्याला खालीलप्रकारे महिना (month), दिवस (day) व वर्ष (year) काढता येतात

महिने (0-11) ऎवजी 1-12 होण्यासाठी getMonth() मध्ये 1 मिळवावा लागतो. 

var month = currentTime.getMonth() + 1
var day = currentTime.getDate()
var year = currentTime.getFullYear()
document.write(day+ "-" + month + "-" + year)

आपल्याला सध्याच्या इलेक्ट्रॉनिक घड्याळातील वेळेप्रमाणे म्हणजे HH:MM AM/PM (तासासाठी दोन जागा व मिनिटांसाठी दोन जागा आणि सकाळचा वा दुपारचा भाग दर्शविण्यासाठी AM/PM ) वेळ दाखविण्यासाथी खालीलप्रकारे प्रोग्रॅम करता येतो.
if (minutes < 10){
minutes = "0" + minutes
}
document.write(hours + ":" + minutes + " ")
if(hours > 11){
document.write("PM")
} else {
document.write("AM")
}
वरील प्रोग्रॅममध्ये 10 पेक्षा कमी मिनिटे असतील तर पहिल्या जागेत 0 लिहिण्याची सोय केली आहे.
--------------
html व javascript चे टॅग काढून आता हा सर्व प्रोग्रॅम खालीलप्रमाने लिहिता येईल.

आजचा दिनांक - 
var currentTime = new Date()
var month = currentTime.getMonth() + 1
var day = currentTime.getDate()
var year = currentTime.getFullYear()
document.write( day+ "-" + month + "-" + year)
document.write(" 
वेळ - ");
var hours = currentTime.getHours()
var minutes = currentTime.getMinutes()
if (minutes < 10){
minutes = "0" + minutes
}
document.write(hours + ":" + minutes + " ")
if(hours > 11){
document.write("PM")
} else {
document.write("AM")
-------------
व त्याचे उत्तर असे येईल. 

आजचा दिनांक - 23-2-2011
वेळ - 9:01 AM