संस्कृत - मराठी - इंग्लिश शब्दकोश
संस्कृत, मराठी, आणि इंग्लिश अशा तीनही भाषेतील ६००० शब्दांचा शब्दकोश ज्ञानदीपने Sanskrit Dictionary या नावाने गुगल प्ले स्टोअरवर प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक संस्कृत शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टीने शब्दविशेषही यात पहाता येतो. संस्कृत शब्द माहीत असेल तर त्याला पर्यायी मराठी व इंग्रजी शब्द या शब्दकोशात शोधता येतो.
या सुविधेची काही चित्रे खाली दाखविली आहेत.
आतापर्यंत संस्कृतचे मराठी वा इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी शब्दकोश उपलब्ध असले तरी मराठी वा इंग्रजी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात असे. या शब्दकोशात मराठी शब्दाला संस्कृत व इंग्रजी पर्याय किंवा इंग्रजी शब्दाला संस्कृत व मराठी पर्याय शोधता येत असल्याने मराठी वा इंग्रजी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्यास या शब्दकोशाची मोलाची मदत होणार आहे.
या शब्दकोशाची किंमत ८० रुपये ठेवण्यात आली असून गुगल प्ले स्टोअरमधून खालील लिंकचा वापर करून तो आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dinesh1432.shabhkosh&hl=en
संस्कृत विषय शिकणार्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.