विलिंग्डन कॉलेजमधील इनोव्हेशन सेंटरची मीटींग - इतिवृत्त

दिनांक १२ जुलॆ २०१८ रोजी दुपारी चार वाजता विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांच्या ऑफिसमध्ये इनोव्हेशन सेंटरची मीटींग झाली. यावेळी प्राचार्यांसोबत  डॉ. उदय नाईक , येरळा प्रोजेक्ट्सचे देशपांडे, महेश पागनीस, कॊस्तुभ सोहोनी,  प्रा. केळकर, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे अरविंद यादव तसेच  कॉलेजमधील अन्य प्राध्यापक उपस्थित होते.

 



सर्वप्रथम प्रा. भालबा केळकर यांनी इनोव्हेशन सेंटरची पार्श्वभूमी विशद केली. वालचंद हेरिटेज इनोव्हेशन सेंटरच्या नावात वालचंदचे नाव असले तरी या प्रकल्पात सर्व कॉलेज व शाळांचा समावेश असून  सर्व संबंधित घटकांना यात सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयातून शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षणाला नवनिर्मिती व उद्योजगतेची जोड देण्यासाठी  विविध प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.

डॉ. रानडे यांनी या प्रकल्पाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कार्यकारी नियामक मंडळ, जागा तसेच आर्थिक सक्षमतेसाठी काही योजना आखण्याची गरज सांगितली. शिवाजी विद्यापीठातील इनोव्हेशन व ्प्रॅक्टीकल ट्रेनिंगच्या योजनेशी  संलग्न हो्ण्यासाठी डे. रजिस्ट्रार डॉ. गिरीश कुलकर्णी व उद्योजक अरविंद देशपांडे यांचेशी झालेल्या चर्चेचा विषय मांडला.

 येरळा प्रोजेक्टचे देशपांडे यांनी जालिहाल येथील त्यांच्या प्रकल्पाची माहिती देऊन ग्रामीण भागात अनेक नवे प्रयोग होत असतात. त्यांची माहिती गोळा करण्याची व त्या प्रयोगांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन त्यांना प्रकाशात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी  यासाठी विद्यार्थ्यांना घरोघरी हिंडून  माहिती संकलित करण्याचा उपयोग होईल आसे सांगून विलिंग्डन कॉलेजने केलेल्या अशा ग्राम सर्वेक्षण प्रकल्पाची माहिती दिली व झेरॉक्स मशिनची गावात गरज आहे हे शोधून काढल्याचे सांगितले. जाकार्ता येथे असणारे  कॊस्तुभ सोहोनी यांनी इंडोनेशियामध्ये  अशाप्रकारच्या चालू असलेल्या प्रयत्नांच्या धर्तीवर येथेही बहुपयोगी ऍप विकसित करता येतील असे सांगितले. श्री. पागनीस यांनी विद्यार्थ्यांच्या नवनिर्मिती प्रकल्पांचा स्पर्धा घेऊन  पारितोषिके दिल्यास अधिक विद्यार्थी याकडे आकर्षित होतील व त्यातून काही उद्योजक बनतील असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. उदय नाईक यांनी उद्योजक बनलेल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे व पुढील मीटींगमध्ये ती सादर करण्याचे आश्वासन दिले. पंधरा दिवसांनी अशी मीटींग परत घेण्याचे तसेच भविष्यात उद्योजक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.