सौरऊर्जेतून वीज निर्मिती
सौरऊर्जा ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ्वीवर असणाऱ्या कोळसा तेल व नैसर्गिक वायू यांची एकूण साठविलेली ऊर्जा ही २० दिवसांच्या सौरऊर्जेइतकी आहे.
सूर्यशक्ती ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सष्टीसाठी याची आवश्यकता आहे. पृथ्वीवर असणार्या कोळसा तेल व नैसर्गिक वायू यांची एकूण साठविलेली ऊर्जा ही २० दिवसांच्या सूयेप्रकाशातकी आहे. पथ्वीच्या वातावरणाबाहेर दर चौरस मीटरला १३०० वॅट सौरऊर्जा असते. यातील काही ऊर्जा परत बाहेर सोडली जाते, काही वातावरणात सोडली जाते व दर चौरस मीटरला सुमारे १००० वॅट जमिनीवर पोहोचते. (आकाशात ढग नसताना दुपारच्या वेळी). याप्रकारे दररोज सुमारे ४.२ किलोवॅट तास एवढी ऊर्जा दर चौरस मीटरला मिळू शकते. मात्र हवामान, मोसम व स्थान यानुसार यात बदल होतो. तसेच ही ऊर्जा फक्त दिवसा मिळते व ऊर्जेचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे ही र्जा एकत्र करून साठवून ठेवण्याची सोय केल्यास त्याचा रात्री वापर करता येतो.
भारतामध्ये सौरऊर्जा अपार आहे. घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा वापर केल्यास वीजेच्या निर्मितीसाठी, पाणी तापविण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळेलच याशिवाय सूर्यप्रकाशाचा वापर घरातील अंधार्या जागेत उजेड आणण्यासाठी केल्यास विजेची बचत होऊ शकेल. उन्हाळयात पंख्यांना व शीतकाला लागणार्या ऊर्जेसाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करता येईल.
सौर ऊर्जा प्रामुख्याने दोन पद्धतीने वापरात आणता येते.
१. सौर औष्णिक पद्धत
२. सौर विद्युत निर्मिती
सौर औष्णिक पद्धत
सौर ऊष्णजल संयंत्र - सौर औष्णिक पद्धतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करता येते. त्यामुळे घरगुती वापरासाठी प्रचलित असलेल्या गीझरच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात बचत होते. सौर ऊष्णजल संयंत्राद्वारे ६० ते ८० अंश सें. तापमानापर्यंत पाणी गरम करता येते. अशा पद्धतीची सौर ऊष्णजल संयंत्रे घरगुती तसेच औद्यागिक क्षेत्र, हॉटेल्स, वसतिगृहे, रुग्णालये इत्यादींमध्ये बसविता येऊ शकतात. दिवदिसेंदिवस विजेचा दर व वापर वाढत असल्याने अशी संयंत्रे बसविल्यास खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची व आर्थिक बचत होऊ शकते. आय्. एस्. आय्. प्रमाणित सौर ऊष्णजल संयंत्रासाठी सवलतीच्या व्याजदराने बँक ऑफ महाराष्ट्न्, युनियन बँक यांच्या सर्व शाखा व क्रॅनरा बँकेच्या ठराविक शाखा वित्तपुरवठा (कर्जपुरवठा) करते.
सौर नि:क्षारीकरण संयंत्र - सौर ऊर्जेचा उपयोग पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यासाठी करता येतो. हे संयंत्र फायबर ग्लास मटेरिअलचे एक चौरस मीटर आकाराचे असून त्याचा वरचा भाग निमूळता असतो. वरच्या बाजूला टफन्ड प्रकारची काच लावलेली असते. या संयंत्रापासून रोज २ ते २.५ लिटर्सपर्यंत क्षार विरहित पाणी मिळविता येते. या पाण्याचा उपयोग मुख्यत्वे प्रयोगशाळा तसेच बॅटरी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये केला जातो. मुख्यत्वे ही संयंत्र दुर्गम भागात क्षाररहित पाणी व इतर उपयोगासाठी वापरली जातात.
सौर चूल - सौर ऊर्जेचा वापर करून अन्न शिजविता येते, ज्यामुळे पारंपरिक इंधनाची बचत करता येते. सौर चूल ही एक चौकोनी पेटी असून अॅल्युमिनियम धातूपासून बनविलेली आहे. सध्याच्या इंधन टंचाईच्या काळात अन्न शिजविण्यासाठी सौर चूल हे एक वरदान ठरले आहे. सौर चूल वापरण्यास अत्यंत सोपी व सुटसुटीत असल्याने लोकप्रिय झाली आहे. सौर चुलीच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही तसेच शिजविलेल्या अन्नपदार्थाची चव मूळ स्वरूपात टिकून राहिल्यामुळे त्यातील सर्व प्रथिने व जीवनसत्वांचा लाभ जास्त प्रमाणात मिळतो. एका सौर चुलीच्या वापरामुळे प्रतिवर्षी अंदाजे ६६ लिटर रॉकेल अथवा ८०० किलो ग्रॅम लाकडाची बचत होते.
पॅराबोलिक सोलर कुकर - पॅराबोलिक सोलर कुकर हा सुट्या भागाच्या स्वरूपात उपलब्ध असून त्याची जोडणी सोपी असते. हा सोलर कुकर घरगुती तसेच हॉटेल, ढाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये एकाच वेळेला १०-१५ माणसांचे अन्न २५-३० मिनिटात शिजविले जाते. वापरण्यास अत्यंत सोपे व कोठेही वाहून (उचलून) नेता येणारा असा हा बहु उपयोगी कुकर असून यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थ सुद्धा करता येतात. तसेच यामध्ये आपला नेहमीचा वापरातला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्येे सर्व प्रकारचे अन्न शिजविता येते.
सौर वाफेवर अन्न शिजविण्याचे संयंत्र - या कार्यक्रमांतर्गत डिशटाईप अंतर्वक्र सौर संकलन ऊर्जा केंद्रीकरण प्रणालीद्वारे पाणी गरम करून उच्च तापमान व दाबाची वाफ निर्मिती करून ती पुढे अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात येते. श्री. साई संस्थान शिर्डी, जि. अहमदनगर येथे अशा प्रकारचा ३००० लोकांकरिता अन्न शिजविण्याचा प्रकल्प उभारण्यात आलेला असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे.
सौर फोटोव्होल्टाईक साधने - सौर फोटोव्होल्टाईक प्रणालीमध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यात येते. सदर तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळया वापरासाठी सौर कंदील, सौर पथदीप, सौर घरगुती दिवे, सौर विद्युत निर्मिती केंद्र इत्यादी संयंत्र व साधने विकसित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत सौर फोटोव्होल्टाईक संयंत्राचा एकूण खर्च जास्त असला तरी भविष्यात तो कमी होण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रीय पातळीवर तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.
सौर कंदील - सौर कंदील हे हलके व सहज वाहून नेता येणारे उपकरण आहे. पूर्णभारित सौर कंदील ३-४ तासांपर्यंत वापरता येतो. सौर कंदील हा फोटोव्होल्टाईक मोड्यूल्स, (कॉम्पॅक्ट फ्ल्यूओरोसेंट लॅम्प) कन्व्हर्टर, इलेक्ट्नॅनिक्स, बॅटरी व प्रोटेक्शन सिस्टिमपासून बनविला जातो. सौर कंदील ५ वॅट / ७वॅट क्षमतेत उपलब्ध आहेत. ५ वॅट / ७ वॅट सौर कंदिलापासून सुमारे २३० / २७० ल्यूमेन्स इतका प्रकाश मिळतो.
सौर घरगुती दिवे - सौर घरगुती दिवे घरात लावता येतात. त्यांचे मुख्य घटक सौर फोटोव्होल्टाईक मोड्यूल (३७ वॅट /७४ वॅट), ७/९/११ वॅट, कन्व्हर्टर, इलेक्ट्नॅनिक्स, बॅटरी व प्रोटेक्शन इत्यादी आहेत. वेगवेगळया क्षमतेचे घरगुती दिवे एका तासापासून चार तासापर्यंत चालविता येतात. त्यात डी. सी. फॅन सुद्धा चालविता येतात. ७/९/११ वॅट घरगुती दिव्यांपासून ३७०/६००/९०० ल्यूमेन्स इतका प्रकाश मिळतो.म्हणजेच तो पारंपरिक विद्युत दिव्याच्या पाचपट इतका अधिक असतो.
सौर पथदीप - सौर पथदीपांचे मुख्य घटक फोटोव्होल्टाईक मोड्यूल (३७ वॅट /७४ वॅट), बॅटरी, कन्ट्नेल इलेक्ट्नॅनिक्स व पथदीप लावण्यासाठी आवश्यक खांब इत्यादी आहेत. सौर पथदीपांमध्ये असलेल्या कन्ट्नेल इलेक्ट्नॅनिक्समुळे ते संध्याकाळ झाली की आपोआप सुरू होतात व पहाट झाली की आपोआप बंद होतात. अशा पथदीपांपासून ९०० ल्यूमेन्स इतका प्रकाश मिळतो.
सौर शैक्षणिक आयुधिका - शाळेतील व महाविद्यालयीन मुलांना सौर ऊर्जेचे रूपांतर वेगवेगळया ऊर्जेत होऊ शकते याबाबत ज्ञान देण्यासाठी सौर शैक्षणिक आयुधिका वापरण्यात येते. या आयुधिकेद्वारे काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग महाविद्यालयातील विद्यार्थी करू शकतात. त्यासाठी या आयुधिकांची विशिष्ट मॉडेल्स उपलब्ध आहेत व त्यांची किंमत त्या मॉडेल्सच्या प्रकारावर अवलंबून असते.
सौर कुंपण - ग्रामीण व दुर्गम भागात जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर कुंपण अत्यंत उपयोगी आहे. अशा उपकरणांपासून जनावराला सौम्य विजेचा घटका बसतो व त्यामुळे जनावरे नेहमी लांब राहतात. अशा झटक्यांनी प्राणहानी होत नाही. सौर कुंपणाची किंमत त्याच्या लांबीवर अवलंबून असते.
सौर वाहतूक सिग्नल यंत्रणा - महापालिका क्षेत्र किंवा मोठ्या शहरातून वाहतूक नियंत्रण प्रमुख रस्त्यावरील चौकात करण्यासाठी सौर वाहतूक सिग्नल यंत्रणेचा वापर करून सिग्नल यंत्रणा बसविता येते. एल्. इ. डी. यंत्रणेचा वापर करून सिग्नल यंत्रणा, प्रायोगिक अवस्थेत बसविता येण शक्य आहे. वरील सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जेवर आधारित उपकरणे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली यांचे मान्यताप्राप्त उत्पादक तसेच महाऊर्जा नोंदणीकृत उत्पादक व त्यांच्या वितरकांकडून परस्पर खरेदी करता येतात.