जगायचे कशासाठी
जन्माला आलो, म्हणजे जगणे भाग आहे म्हणून नव्हे तर प्रचंड आसक्तीने . माणूस जगण्यासाठी लागणारी सारी धडपड करत राहतो. ही प्रेरणा निसर्गदत्त असते.माणूस जगत राहतो पण आपण कशासाठी जगतो याचा विचार मात्र फारसा कधी करीत नाही.
आपल्याला काहीतरी करायचे आहे. काही उद्दीष्ट साध्य कराहचे आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येते त्यावेळी जगण्याला एक वेगळीच सकारात्मक दिशा प्राप्त होते आणि मग जगायला मिळणे ही एक अनमोल पण मर्यादित काळापुरती संधी आहे व तिचा मी पुरेपूर उपयोग करून माझ्या आशा आकांक्षा पूर्ण करेन आशी ईर्षा मनात निर्माण होते व मग आविरत कार्यमग्नता हेच त्याचे जीवनाचे उद्दीष्ट बनते.
निव़त्त होणे याचा खरा अर्थ म्हणजे शारिरिक व्याधीची नवी बंधने व काम करण्याच्या क्षमतेत झालेली नैसर्गिक घट याँचा स्वीकार करणे.. त्याचा आपल्या बौद्धिक क्षमतेवर वा मानसिकतेवर प्रभाव पडण्याचे काहीच कारण नाही. उलट आपले आयुष्य आता कमी उरले या जाणीवेने कार्याची गती वाढणे अपेक्षित आहे. पण होते काय, की निवृत्तीनंतर माणूस आपली जीवनातली इतिकर्तव्यता संपली आता फक्त आराम करायचा या कल्पनेने ग्रासला जातो. नातेवाईक व समाजही त्याच्याकडे एक सांभाळायचे ओझे या दृष्टीने पाहतो. काहीही न करण्याची मानसिकता त्यातून निर्माण होते. काम थांबले, आराम वाढला की शारिरीक व्याधी जोर धरू लागतात. माणूस आणखीनच खचून जातो. याउलट तो जर पूर्वीप्रमाणेच पण झेपेल तेव्हडे आपल्या आवडीचे काम करीत राहिला तर आरामापेक्षा उच्च प्रतीचा वेगळा आनंद त्याला मिळत राहील. नातेवाईक व समाजालाही त्याची प्रतिष्ठा वाढेल आणि गरजही वाटेल.
निवृत्त झाल्यावर बॅंक व शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कसे वाढतील याकडे डोळे लावून बसणे हा ब-याच लोकांचा आवडीचा छंद असतो. काही व्यक्ती धर्मादाय संस्थेला दान दान देऊन मानसिक समाधान मिळवितात. तर बरेचसे सामाजिक कार्यात स्वतला गुंतवून घेतात.
याशिवाय आणकी एक पर्याय आहे. तो म्हणजे आपले ज्ञान व अनुभवाचा उपयोग होईल असा व्यवसाय सुरू करणे. नोकरी वा व्यवसायाच्या ओधात असणा-या नवयुवकांना हाताशी धरून अगदी कमी मानधन देऊनही आपल्याली काही उद्योह सुरू करता हेईल. याचे अनेक फायदे आहेत. पहिला दृष्य फायदा म्हणजे रोजगार निर्मिती. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास मिळालाली संधी, प्रशिक्षित पण अनुभव नसणा-या युवकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या उत्साही समूह चर्चेत सामील होणे. आपल्या त्यांच्याकडून मिळणारी आदरायुक्त मदत, आपम्या एकटेपणात वा आजारीपणात वा प्रवासात मिळणारी सोबत निश्चितच फार मोलाची आहे.
असे केले तर आपल्या जीवनाला एक वेगळे आनंददायी वळण मिळेल, आपण पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटेल. समाजालाही आपला फायदा होईल. निदान मलातरी ज्ञानदीपच्या कार्यात सक्रीय सहभागी झाल्याने असा लाभ झाला आहे. डॉ. सु. वि. रानडे, र्ानदीप, सांगली.