मराठी लेख
ग्रीन - टेक डॉट बीझ
ग्रीन - टेक डॉट बीझग्रीन बिल्डिंगग्रीन बिल्डिंगची आवश्यकता
Visit Us: www.green-tech.bizवाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणार्या गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात. एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते. बिल्डिंग व्यवसायात वाढ झाली असली तरी बांधकाम व्यावसायिक इमारतीच्या दिखाऊपणास जास्त महत्व देताना दिसतात. त्यामुळे गरज नसताना किंवा इमारतीतील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होईल अशा रचना करताना आढळतात. यामुळे एअर कंडिशनर, प्रकाशासाठी जास्त ऊर्जा लागणारे दिवे, घातक वायू उत्पन्न करणार्या अंतर्गत सजावटीच्या वस्तू यांचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे इमारतीतील पर्यावरण दूषित होते ऊर्जेसाठीच्या खर्चात वाढ होते व शहराच्या सेवासुविधांवरही अतिरिक्त ताण पडतो. यासाठी पर्यावरणपूरक इमारत म्हणजेच ग्रीन बिल्डिंग बांधण्याविषयी लोकशिक्षण व जागृती अभियान आवश्यक आहे. ग्रीन बिल्डिंग संकल्पना• सौरऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर, • नैसर्गिक वायुवीजन • निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्या वस्तूंचा बांधकामात वापर • पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर • घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे • पर्जन्य जलसंधारण • सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, घन कचर्यापासून खत वा बायोगॅस ग्रीन बिल्डिंगच्या कल्पनेला अधिक चालना मिळावी यासाठी अमेरिकन ग्रीन बिल्डिंग कौंसिलने इमारतीचा पर्यावरणविषयक दर्जा निश्चित करण्यासाठी Leadership in Energy and Environmental Design (LEED) गुणांकन पद्धत तयार केली आहे. लीड गुणांकन पद्धत• २६-३२ गुण लीड प्रमाणित बिल्डिंग • ३३- ३८ गुण सिल्व्हर दर्जाची बिल्डिंग • ३९- ५१ गुण गोल्ड दर्जाची बिल्डिंग • ५५-६९ गुण प्लॅटिनम दर्जाची बिल्डिंग |
माय कोल्हापूर डॉट नेट
माय कोल्हापूर
प्राचीन काळापासून कोल्हापूरचा इतिहास, कोल्हापूरची वैशिष्ठ्ये, शहरातील तसेच कोल्हापूर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, किल्ले, तीर्थक्षेत्रे यांची सचित्र माहिती या वेबसाईटवर आहे. सर्व महत्त्वाचे फोन व संपर्क पत्ते यात आहेतच शिवाय फोटोगॅलरी, विनोद, सिनेमा यासारखी मनोरंजनपर माहिती व वधू वर सूचक माहिती, हवामान, सोन्या चांदीचे भाव इत्यादी अनेक आवश्यक माहिती यात आहे. नुकत्याच घडून गेलेल्या प्रलयंकारी महापूराचे रौद्ररूप दर्शविणाऱ्या छायाचित्रांचा संग्रहही या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कोल्हापूरचा नकाशा. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा माहिती पूर्ण नकाशा तयार केला असून यात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती तसेच त्याचे स्थान पाहता येते. या नकाशावर व्यावसायिकांना आपली जाहिरात करण्याची सोय केल्यामुळे व्यवसायाचे स्थान, पत्ता व माहिती ग्राहकास पाहता येणार आहे. अशी सुविधा भारतातील फारच थोड्या वेबसाईटवर पहावयास मिळते. या अभिनव वेबसाईटवर आपली जाहिरात करून सर्व जगभर आपल्या मालाची व व्यवसायाची माहिती देण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे. Visit Us : www.mykolhapur.net |